Follow us on Twitter
देव आणि प्रवासी प्रिंट ई-मेल
वापरकर्त्यांनी दिलेली गुणवत्ता: / 1
खराबसर्वोत्तम 
बाल जगत - इसापनिती

एकदा एक मनुष्य प्रवास करीत असता, त्याच्या मनात देवाची थट्टा करावी असे आले व त्याने आपल्याला काय मिळेल त्याचा अर्धा हिस्सा देवास देऊ, असा नवस केला. पुढे दुसर्‍या प्रवाशाची एका खारकांची पिशवी त्याला सापडली. तेव्हा त्याने त्यातील सगळ्या खारका स्वतः खाल्ल्या व त्यांच्या बिया नेऊन त्या देवापुढे ठेवून तो म्हणाला,

'देवा, मी नवस केल्याप्रमाणे माझ्या मिळकतीतला अर्धा वाटा तुझ्यापुढे ठेवला आहे.'

तात्पर्य - नुसते शब्द फिरवून देवालाही फसवू पहाणारे काही लबाड लोक असतात.


- {Khapre.org} वरून साभार
 

Latest group walls

  • बालसà¤à¤¸à¥à¤à¤¾à¤° - Balsanskar आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्‍न करण...

अलीकडील सभासद